अमळनेर कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्र चालकांसाठी ‘साथी पोर्टल’ प्रशिक्षण संपन्न..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुका सीड पेस्टिसाइड फर्टिलायझर असोसिएशनच्या सदस्यांसाठी अमळनेर कृषी विभागातर्फे ऑनलाइन बियाणे विक्री साथी पोर्टल संदर्भात एकदिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सभापती अशोक आधार पाटील होते. तर मार्गदर्शन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी व जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी केले.
प्रशिक्षणादरम्यान कृषी क्षेत्रीय अधिकारी महाबीज जळगाव येथील संजय देवरे यांनी पीपीटीच्या माध्यमातून साथी पोर्टलची सविस्तर माहिती दिली. तसेच ऑनलाइन नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी विकास बोरसे यांनी मार्गदर्शन केले. कृषी मोहीम अधिकारी अविनाश खैरनार यांनी पोर्टलवर बियाणे विक्री प्रक्रियेचे सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे होते. प्रशिक्षणास अमळनेर तालुका सीड पेस्टिसाइड फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पवार, सचिव प्रदीप पारेख यांच्यासह अनेक कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुण नियंत्रक अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले तर आभार सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील यांनी मानले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1320/-
🎂
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
