सेवा पंधरवाडा उपक्रम युद्धपातळीवर राबवा – उपविभागीय अधिकारी मुंडावरे

0
New-Doc-09-12-2025-22.57.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे उपक्रम युद्धपातळीवर राबविण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

या बैठकीत त्यांनी माहिती दिली की सेवा पंधरवाडा तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

  • पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर): पाणंद रस्ते विषयक मोहीम
  • दुसरा टप्पा (२३ ते २७ सप्टेंबर): ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमासाठी पूरक कार्यक्रम
  • तिसरा टप्पा (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर): नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी

शेतावर जाण्यासाठी रस्त्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी संमती पत्र घेणे, रस्ता अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांचे मोजणी व सीमांकन करणे यावर भर दिला जाणार आहे. तसेच रहिवासी प्रयोजनासाठी अस्तित्वातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमित करणे, शहरातील आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास गायरान नोंदी कमी करून अतिक्रमणे नियमानुकूल करणे, तसेच सुसंगत नसल्यास आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीस नायब तहसीलदार सी. यू. पाटील, नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, भूमिअभिलेख अधीक्षक स्मिता गावित, कल्याणी पाटील, प्रियंका पाटील यांच्यासह मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1320/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed