बालविवाह निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – प्रांताधिकारी मुंडावरे..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :बालविवाहामुळे उद्भवणारे प्रश्न लक्षात घेऊन कायदा अस्तित्वात असला तरीही अज्ञान, अशिक्षितपणा आणि छुप्या पद्धतींमुळे बालविवाह थांबलेले नाहीत. नुकताच भिलाली येथे घडलेला प्रकार त्याचे उदाहरण असून त्याबाबत मारवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बालविवाह रोखण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे, तर समाज आणि पुरोहित यांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. सामाजिक जाणिव ठेवून या भस्मासुराचे दहन करण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे आवाहन प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी केले.
‘जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन’ या जागतिक बालविवाह निर्मूलन सप्ताहांतर्गत आधार बहुउद्देशीय संस्था, मंगळग्रह सेवा संस्था व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर परिसरात जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, पुरोहित संघाचे राजेंद्र निजामपूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रफुल्ल जोशी, मंदार कुलकर्णी, दिलीप बहिरम व भरत पाटील यांनी समाज, पुरोहित संघ आणि प्रशासनाने सजगतेने भूमिका निभावल्यासच बालविवाह रोखण्याचे उद्दिष्ट साध्य होईल असे मत व्यक्त केले.
उपस्थितांनी बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मोहिनी धनगर यांनी केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1320/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
