टाळाटाळ नकोच, आधी एफआयआर नोंदवा – सर्वोच्च न्यायालयाचे पोलिसाना आदेश.
24 प्राईम न्यूज 12 Sep 2025

नवी दिल्ली – पोलिसांनी एफआयआर नोंदवताना टाळाटाळ न करता तक्रारदाराने दिलेल्या माहितीवर तात्काळ कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत.
दखलपात्र गुन्ह्यांबाबत तक्रार आली, तर पोलिसांनी कोणतेही कारण पुढे करता कामा नये. प्राथमिक माहिती खरी आहे का, विश्वासार्ह आहे का, हे पाहण्याऐवजी प्रथम एफआयआर दाखल करून तपास सुरू करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, असे न्यायालयाने ठणकावले.
गुन्ह्याची नोंदणी टाळण्याची प्रवृत्ती थांबविण्यासाठीच हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला असून, तक्रारदाराचा हक्क अबाधित राहावा यासाठी पोलिसांनी तत्काळ पावले उचलली पाहिजेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, तक्रारदाराने किंवा पीडित व्यक्तीने दिलेली माहिती खरी आहे का, विश्वासार्ह आहे का, यावर एफआयआर नोंदवला जाण्याचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेताना या गोष्टींचा विचार केला नाही पाहिजे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 112500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10350/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
