जरांगे-पाटलांचा इशारा : “मराठा आरक्षणात हस्तक्षेप झाला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ”

0
New-Doc-09-12-2025-07.13.jpg

24 प्राईम न्यूज 12 Sep 2025


मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाला (जीआर) कोणी कोर्टात आव्हान दिल्यास आम्हीही ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देऊ, असा आक्रमक इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.

जरांगे यांनी म्हटले की, “मराठा आरक्षणासाठी आम्ही प्रचंड संघर्ष केला, त्यासाठी रक्त सांडले. आमचा जीआर खूप कष्टाने मिळवला आहे. त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही कोट्यवधींच्या संख्येने रस्त्यावर उतरू.”

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आता छगन भुजबळ यांची भूमिका कळाली आहे. “ओबीसींच्या नावाखाली इतर जातींना आरक्षण मिळू नये, यासाठी भुजबळ प्रयत्नशील आहेत. ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आता सरकार भुजबळांना काही किंमत देणार नाही,” असा टोला जरांगे यांनी लगावला.

या इशाऱ्यामुळे आगामी काळात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वादंग अधिक पेटण्याची शक्यता आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 112500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10350/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed