धुळे महानगरपालिकेचा मुकडदम लाच घेताना रंगेहात अटक

0
New-Doc-09-12-2025-06.41.jpg

24 प्राईम न्यूज 12 Sep 2025


धुळे : धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मुकडदम रविंद्र शामराव धुमाळ (वय ५०) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी गुरुवारी (दि. ११ सप्टेंबर) ७,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

तक्रारदार हे धुळे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची हजेरी घेणे व ती निरीक्षकांकडे पाठविण्याचे काम आरोपी धुमाळ याच्याकडे होते. पगार काढून देण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे ८,००० रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर ७,००० रुपयांवर व्यवहार ठरला.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीनंतर सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यावेळी आरोपीने तक्रारदाराकडून ७,००० रुपये स्वतः स्वीकारले आणि त्याला पथकाने रंगेहात पकडले.

सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल तसेच पथकातील पोलीस कर्मचारी सहभागी होते. या कारवाईला पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.

लाचलुचपत विभागाने आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय/निमशासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा खाजगी पंटर यांनी कामाकरिता लाच मागितल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 112500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10350/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed