तीन दशकांपासून मोबदल्याविना शेतकरी त्रस्त – अनवर्देतील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर अप्पर तापी प्रकल्प हतनूर (जळगाव) करिता संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला गेली तीन दशके न मिळाल्याने अनवर्दे खुर्द (ता. चोपडा) येथील शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. ७७ शेतकऱ्यांच्या जमिनी संयुक्त मोजणी नुसार संपादित करून प्रकल्पासाठी वापरल्या गेल्या असून पाटाच्या पाण्याचा लाभ घेतला जात असतानाही, संबंधित शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
या प्रश्नासंदर्भात गेली ३० वर्षे शेतकरी पाठपुरावा करीत असून सरकार व संबंधित विभागांकडून केवळ टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने उमराव भाऊराव बोरसे हे १० सप्टेंबरपासून कार्यकारी अभियंता, निम्न तापी प्रकल्प कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्याप कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही.
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, सुनिल पाटील, रामराव पवार, उर्वेश साळुंखे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी समितीने कार्यकारी अभियंता श्री. कडलग यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी केली.
आंदोलन स्थळी महेंद्र बोरसे यांच्या सहकार्याने अनेक अन्यायग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित राहून उपोषणकर्त्यांना समर्थन दिले. यामध्ये रामराव बोरसे, रवींद्र बोरसे, जगतराव बोरसे, तुषार बोरसे, श्रीराम बोरसे, धनराज बोरसे, अरुण बोरसे, शशिकांत बोरसे, निंबाजी पाटील, जगतराव भटा पाटील, हिरामण कोळी, नितीन गोसावी, दीपक धनगर, कैलास शिरसाट, मुकेश बोरसे, राजेंद्र घिसाडी, धनंजय साळुंखे, शरद बोरसे, सुरेश गोसावी, राजेंद्र पाठझड आदींचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मोबदल्याच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने दिला आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 112500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10350/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
