शालेय मनपा व उर्वरित मुलींच्या फुटबॉल स्पर्धा.      . नागरिक शिक्षण पारोळा, एम जे व रुस्तमजी विजयी..

0
New-Doc-09-11-2025-09.25.jpg

24 प्राईम न्यूज 11 Sep 2025
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय मनपा व जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन गोदावरी फाउंडेशनच्या सहकार्याने गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर सुरू असून ११ सप्टेंबर रोजी तीन गटातील फुटबॉल स्पर्धला संघटनेचे सचिव फारुक शेख, एम जे कॉलेजच्या प्राध्यापिका, अर्चना जाधव यांनी किक मारून तर बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका छाया चिरमाडे यांनी टॉस करून स्पर्धेचे उद्घाटन केले. या वेळी प्रा.सुरेखा पाटोळे, प्रा रणजीत पाटील, हिमाली बोरोले व ममता प्रजापत यांची उपस्थिती होती.
पारितोषिक वितरण समारंभाला दैनिक लोकमतचे राहुल अहिरे, हिमाली बोरोले,फारुक शेख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष नदीम मलिक, सामाजिक कार्यकर्ते अनिस शहा व इरफान अली सैयद, क्रीडा शिक्षक मनोज वारके,सुरेखा भोळे, संदीप पवार यांच्या हस्ते विजेते व उप विजेते संघास पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धा यशस्विते साठी वसीम रियाज, वसीम चांद, तौसिफ शेख, साबीर शेख, राहील अहमद, अनस शेख, अमीन शेख हे परिश्रम घेत आहे.

स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्षांतील मुली ( उर्वरीत )
विजयी. = रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल जळगाव
उपविजयी = नागरिक शिक्षण मंडळ पारोळा
तृतीय = बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ

१९ वर्षांतील मुली ( मनपा)
विजयी. = स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्याल जळगाव
उपविजयी = डॉ अण्णासाहेब जी. डी बेंडाळे महिला महाविद्यालया जळगाव

१९ वर्षातील मुली ( उर्वरीत)
विजयी. = नागरिक शिक्षण मंडळ पारोळा
उपविजयी = पी . ओ. नाहटा ज्युनिअर कॉलेज भुसावळ
तृतीय= सेंट मेरी ज्यू. कॉलेज एरंडोल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed