दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळविले..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : तालुक्यातील एका गावातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्याची १४ वर्षांची मुलगी व १५ वर्षांची भाची या दोघी ८ सप्टेंबर रोजी रात्री शेजारील नातलगांकडे झोपायला गेल्या होत्या. मात्र मध्यरात्री शौचास जातो असे सांगून त्या बाहेर पडल्या आणि परतल्या नाहीत. बराच वेळ झाला तरी मुली न परतल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली. परंतु त्या सापडल्या नाहीत.
अखेर अमळनेर पोलिसांत फिर्याद नोंदविण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1300/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
