मांडळ परिसरात बेछूट वाळू उत्खनन; प्रशासन ढिसाळ, तलाठ्यांचा टोलवाटोलवीचा खेळ!
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर मांडळ परिसरात दिवसाढवळ्या वाळू उत्खनन सुरू असून एकावेळेस तब्बल २० ते २५ ट्रॅक्टर आणि ७ ते ८ डंपर वाळू उतरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांनी या बेकायदेशीर उत्खननाबाबत मांडळ तलाठ्यांना वारंवार फोन करून तक्रारी केल्या. मात्र, जबाबदारी स्वीकारण्याऐवजी तलाठ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
एका तलाठ्याने “मी चार्ज सोडला आहे” असे सांगत जबाबदारी झटकली, तर दुसरे “मी अजून चार्ज स्वीकारला नाही” असे म्हणत हात झटकताना दिसले. यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई करण्याऐवजी प्रशासनातील अधिकाऱ्यांचा टोलवाटोलवीचा खेळ सुरू आहे.
दरम्यान, वाळू माफियांचे धाडस एवढे वाढले आहे की, खुलेआम ट्रॅक्टर-डंपर फिरत असून शासनाला मोठ्या महसुली तोट्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1300/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
