मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथील मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय, करणखेडा (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नंदकिशोर शंकरराव पवार होते. या प्रसंगी मार्गदर्शनासाठी आलेले श्री. विवेक सूर्यवंशी सर व श्री. चेतन वैराळे सर यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
श्री. ए.बी. धनगर सर यांनी संस्थेच्या कार्याविषयी तसेच वर्धापन दिनाचे महत्त्व थोडक्यात सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रयोग सत्र घेण्यात आले. प्रयोग थेट दाखवण्याऐवजी मुलांना आव्हानात्मक प्रश्न विचारून त्यांना वैज्ञानिक कारणांचा शोध घेण्यास प्रवृत्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काही विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग सादर करून त्यामागील कारण स्पष्ट केले.
५ वी ते १० वीपर्यंतच्या एकूण १९७ विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेतला. प्रयोगानंतर विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए.बी. धनगर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. प्रशांत पाटील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1300/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
