महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ रद्द करण्याची मागणी. महाविकास आघाडीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने अमळनेर येथे “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
आघाडीचे पदाधिकारी व नेत्यांनी या विधेयकाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, हे विधेयक घटना विरोधी असून लोकशाहीला बाधक आहे. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे आवाज दाबणे, शासनविरोधी नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, तसेच दडपशाहीचे वातावरण निर्माण करणे, हा शासनाचा हेतू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या विधेयकामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण पसरले असून, लोकशाही व्यवस्था धोक्यात येऊ शकते, अशी चिंता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
निवेदन देताना तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात आबासाहेब बी. एस. पाटील, भागवत सूर्यवंशी, डी. एम. पाटील, प्रशांत निकम, मनोहर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई वाघ, गजेंद्र साळुंखे, प्रा. अशोक पवार, संदीप घोरपडे, प्रा. श्याम पवार, मनोज पाटील, बन्सीलाल भागवत, प्रवीण जैन, प्रतापनगरात पाटील, रोहिदास कापडे, योजना पाटील, कविता पवार, धोंडू झगा महाजन, दिलीप पाटील, मगन पाटील, डॉ. रवींद्र पाटील, राजेंद्र सेना पाटील, ए. डी. पाटील, चंद्रशेखर भावसार, एड. शकील काजी, हर्षल जाधव, अरुण शिंदे, विठ्ठल पवार, पार्थ राज पाटील, शरद पाटील, तुकाराम चौधरी, जाकीर शेख, गुलाब बोरसे, विकास पाटील, देविदास पाटील, देविदास भोई, शांताराम कोळी, सुभाष शिंदे, योगेश शिसोदे, प्रकाश पाटील, वासुदेव पवार आदी मान्यवर सहभागी झाले होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1300/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
