अमळनेर शांतता कमिटी बैठक : पोलीस अधीक्षक रेड्डींचं आवाहन – “सण आनंदासाठी, तणावासाठी नव्हे”
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :शहरात वाढत चाललेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, “आपल्याच महिला व लहान मुले गणेश विसर्जन मिरवणुकीत का सहभागी होत नाहीत, याचा विचार करा. इतर गावांमध्ये होणाऱ्या मिरवणुकांचे चित्र पहा. पोलीस व कायद्याचा सन्मान राखा आणि पुण्यभूमी अमळनेरचे नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या.”
अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “एक वर्षांच्या निरीक्षणात अमळनेरचे वातावरण बिघडले आहे. दोन समाजात निर्माण होणारी तेढ धोकादायक आहे. तरुणाई व जेष्ठ मंडळींमध्ये संवाद व्हायला हवा. विनाकारण खुन्नस देणे, सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसरविणे यामुळे शांततेचा भंग होत आहे. हे शहर तुमचे आहे, येणाऱ्या पिढीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे नागरिकांच्या हातात आहे.”
त्यांनी खंत व्यक्त करताना म्हटले की, “जिल्ह्यात फक्त अमळनेरलाच पहाटे पाच वाजेपर्यंत मिरवणूक चालली. विसर्जनावेळी पोलिसांना विनाकारण त्रास देण्यात आला. निम्म्याहून अधिक जण दारूच्या नशेत होते, हे गंभीर आणि चुकीचे आहे.”
दरम्यान, इंदिरा भुवन येथे एस.पी. रेड्डी यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. या वेळी माजी नगरसेवक हाजी शेख सलीम ( शेखा मिस्तरी) यांनी दोन्ही समाजाकडून गणेश विसर्जन व ईद निमित्त दगडी दरवाजातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांचे मार्ग बदलून पर्यायी मार्ग देण्यात यावेत, अशी मागणी केली. यामुळे वाद होणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. तर मुक्तार खाटीक यांनी “मुस्लिम बांधवांचे म्हणणेही प्रशासनाने ऐकावे” अशी सूचना मांडली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1300/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
