अमळनेर : ईद मिरवणुकीवर दगडफेक; दोन्ही गटातील १० जणांवर गुन्हा दाखल..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : शहरातील ईद मिरवणुकीदरम्यान झालेल्या आरडाओरड आणि दगडफेकीच्या प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील १० जणांवर तसेच काही अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
गोपनीय अंमलदार सिद्धांत शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गांधलीपुरा पोलिस चौकीसमोरून मिरवणूक जात असताना दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी एका गटातील शरद दिलीप पाटील (रा. शिरुड नाका), गौरव जयवंत देसले (रा. वड चौक), मनीष रवींद्र महाजन (रा. शिरुड नाका), राहुल रमेश भोई (रा. शिवशक्ती चौक) यांच्यासह काही जणांनी आरडाओरड केली.
या घटनेनंतर दुसऱ्या गटातील वसीम उर्फ मोहसीन मेहमूद बागवान (रा. कोष्टीवाडा), इम्रान शेख सलीम (रा. शाहआलम नगर), शाहीन बेग असलम बेग मिर्झा (रा. गांधलीपुरा), साहिलखान आमिद खान पठाण (रा. गांधलीपुरा), इस्माईल जहुर पठाण (रा. जिनगर गल्ली), शाहरुख (पूर्ण नाव अज्ञात) व इतर साथीदारांनी दगडफेक केली. त्याला प्रतिहल्ला म्हणून पहिल्या गटानेही दगडफेक केली.
या गोंधळात पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही दगडफेक झाली. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर दोन्ही गटातील आरोपी पळून गेले.
या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 110, 132, 121(1), 189(2), 191(2), 191(3), 190 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(1), 37(3), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1300/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
