युवासेना तालुका उपप्रमुखपदी ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती..

0
New-Doc-09-05-2025-22.04.jpg

आबिद शेख/ अमळनेर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेना तालुका उपप्रमुखपदी कंडारी येथील कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने जाहीर करण्यात आली.

पक्षनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या पाटील यांच्या कार्याचा व अनुभवाचा उपयोग पक्ष संघटन बळकटीसाठी होणार असल्याचे युवासेना तालुकाध्यक्ष राजेंद्र मराठे, शिवसेना शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, शहर संघटक मोहन भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार, माजी उपजिल्हा प्रमुख देवेंद्र देशमुख आणि उपतालुका प्रमुख विलास पवार यांनी नमूद केले.

ज्ञानेश्वर पाटील यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून कंडारी ग्रामस्थांसह शिवसैनिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 109000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 100300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 82900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1285/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed