अमळनेरात यंदाही शांततेत विसर्जन करणाऱ्या मंडळांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान..

0
New-Doc-09-05-2025-21.43.jpg


आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर –शहर व तालुक्यातील गणेशोत्सवात शांततेचे प्रतीक ठरलेल्या गणेश मंडळांचा तसेच उत्सवात सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यंदाही सन्मान करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशी, दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून दगडी दरवाजा जवळ भव्य स्वागत मंच उभारून मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.

यंदाही सर्व गणेश मंडळांनी उत्साहात परंतु शांततेत विसर्जन मिरवणूक काढून “श्री सन्मानाचे मानकरी” व्हावे, असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, श्री मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर, आदित्य बिल्डर्स अँड शिव पेट्रोलियम, व्हॉइस ऑफ मीडिया अमळनेर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर, अमळनेर नगरपरीषद, महसूल विभाग व पोलीस स्टेशन अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, पाचव्या, सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी शांततेत विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 109000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 100300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 82900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1285/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed