विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम..

0
New-Doc-09-05-2025-22.22.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :रोटरी क्लब अमळनेर आणि नवजीवन प्लस सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विशेष पुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “संकल्प – चांगला माणूस बनण्याचा” (संकल्पना व संपादन : गिरीष कुलकर्णी) हे पुस्तक शहरातील चार शाळांमधील विद्यार्थ्यांना भेटस्वरूप देण्यात आले या पुस्तकात मानसिक आरोग्य, सूर्यनमस्कार, संतुलित आहार, वेळेचे नियोजन, अभ्यासाची पद्धत, पर्यावरणपूरक जीवनशैली अशा विविध विषयांवर मार्गदर्शन दिले आहे. विद्यार्थ्यांना या पुस्तकावर आधारित प्रश्नावली देण्यात येणार असून उत्कृष्ट विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या वतीने बक्षिसे दिली जातील.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना चांगले विचार, माणुसकी आणि सकारात्मकतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच रोटरीची चार प्रश्नांची चाचणी विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रो. देवेंद्र कोठारी, रो. अभिजीत भांडारकर, रो. दिलीप भावसार यांचे विशेष सहकार्य लाभले. तर श्री. निखिल जैन (नवजीवन प्लस सुपर शॉपी) यांनी सहकार्य केले. शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्गही सक्रियपणे सहभागी झाले.

शिक्षक दिनाच्या औचित्याने सर्व शिक्षकांना रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, चांगल्या सवयी आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“सेवा हीच खरी प्रतिष्ठा” या मूलमंत्रानुसार रोटरी क्लब अमळनेरचे हे कार्य वाखाणण्याजोगे ठरले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 109000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 100300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 82900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1285/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed