अमळनेर पोलिसांचा मॉक ड्रिल व रूट मार्च : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पूर्वी कायदा-सुव्यवस्था राखण्याचा संदेश..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर गणेशोत्सव व आगामी ईद-ए-मिलाद या पारंपरिक सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अमळनेर पोलिसांनी मॉक ड्रिल व रूट मार्च काढून नागरिकांना सज्जतेचा संदेश दिला.
आज (२८ ऑगस्ट) सकाळी ९.४५ ते ११.४५ या वेळेत पोलीस मुख्यालय जळगावचे कवायत निर्देशक यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.श्री. विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, सो. अमळनेर भाग) तसेच श्री. दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक, अमळनेर) यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधलीपुरा येथे दंगा काबू मॉक ड्रिल घेण्यात आली. यात ढाल, लाठी, गॅसगन, शिल्ड, ग्रेनेड आदी साहित्य वापरून प्रात्यक्षिक सराव करण्यात आला.
यानंतर शहरातील संवेदनशील भाग – आंबेडकर चौक, सुभाष चौक, बाजारपेठ, तिरंगा चौक, कुंटे रोड, पवन चौक, झामी चौक, आखाडा मकान, कसाली डीपी, जामा मशीद, सराफ बाजार, दगडी दरवाजा, गुळ बाजार व गांधलीपुरा चौकी परिसरातून मोठा रूट मार्च काढण्यात आला.
या सरावात अमळनेर पोलीस स्टेशनचे ४ अधिकारी व ३६ अंमलदार, मारवडचे १ अधिकारी व ११ अंमलदार, पारोळाचे १० अंमलदार, एरंडोलचे ७ अंमलदार, पोलीस मुख्यालयाचे दंगा नियंत्रण पथक, १ स्ट्रायकिंग फोर्स व ६२ होमगार्ड सहभागी झाले होते.
या मॉक ड्रिल व रूट मार्चदरम्यान नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 103300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 78500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
