अपंग गणपती मूर्ती विक्रेत्यास एकता संघटनेची आर्थिक मदत : समाजात बंधुत्वाचा संदेश..
24 प्राईम न्यूज 29 Aug 2025

जळगाव – शहरातील एका अपंग गणपती मूर्ती विक्रेत्याच्या २५ मूर्ती यंदा विकल्या न गेल्याने त्याच्यावर आर्थिक संकट कोसळले. त्यातच महानगरपालिकेच्या एका अनधिकृत कंत्राटदाराने जबरदस्तीने ७०० रुपये वसूल केल्याने त्याच्या अडचणीत भर पडली. ही बाब प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर एकता संघटनेने पुढाकार घेत विक्रेत्याला मदतीचा हात दिला.
एकता संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख यांनी हुफ्फाझ फाउंडेशनचे सदस्य हाफिज रहीम पटेल, हाफिज शफीक पटेल, हाफिज गुफरान, हाफिज इम्रान आणि आसिफ भाई यांच्यासह विक्रेत्याचे घर शोधून काढले. ते संभाजी नगरमधील देवेंद्र नगर येथे जाऊन अपंग विक्रेता विकी मिस्त्री व त्यांच्या आई-वडील व भावासमोर ५००० रुपयांची आर्थिक मदत दिली तसेच कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी फारूक शेख म्हणाले की, “मानवता आणि मानवतेची सेवा हा इस्लामचा मुख्य भाग आहे. हजरत मोहम्मद पैगंबरांनी शिकवले आहे की प्रत्येक गरजूंना मदत करणे हा सर्वात मोठा धर्म आहे.”
या प्रसंगी मुस्लिम समाजातील अनेक सदस्य दाढी, टोपी व पायजमा घालून गैर-मुस्लिम वस्तीत पोहोचले व अपंग विकी मिस्त्री, वडील दत्तू मिस्त्री, भाऊ भावेश व आई लता यांना भेटवस्तू देऊन आधार दिला. या उपक्रमामुळे परिसरात सौहार्द, बंधुता व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिकांनी एकता संघटनेच्या या कार्याचे स्वागत केले असून “धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा करण्याचा हा प्रेरणादायी संदेश समाजासाठी आदर्श आहे” अशी भावना व्यक्त केली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 103300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 78500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
