अमळनेरात पुन्हा कचराकोंडी : ठेकेदाराला पालिकेचे लाड की नागरिकांची फसवणूक?

0
New-Doc-08-29-2025-21.37.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :- शहरातील कचरा संकलनासाठी अवघ्या १८ घंटागाड्या आणि ६० कर्मचारी असून त्यातही काही गाड्या गॅरेजला लावल्या आहेत तर काही धुळखात पडल्या आहेत. परिणामी शहरात कचराकोंडी झाली असून, नाशिकचा ठेकेदार केवळ बिले काढून पैसे उकळतोय, असा आरोप होत आहे.

शहरातील कचरा संकलनाचा ठेका नाशिकच्या एस. आर. ग्रीनवे एम्पायर कंपनीला देण्यात आला असून, कोरोनापासून एकच ठेकेदार परस्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठेका घेत आहे. टेंडर न करता ठेका दिला गेल्याने मिलीभगतीचे गंभीर आरोप होत आहेत काही प्रभागात वेळेवर घंटागाडी न आल्याने नागरिकांना घरातच कचरा साठवावा लागतो. पावसाळ्यात दुर्गंधी आणि डासांचा त्रास वाढल्याने साथीचे आजार पसरत आहेत. १०० पेक्षा जास्त हॉटस्पॉट्सवर कचऱ्याचे ढीग पडून शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठेकेदाराचे लाड का? पालिका प्रशासन गेली कित्येक वर्षे नवीन ई-निविदा न काढता जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ देत आहे. त्यामुळे हा ठेकेदार “कोणाचा लाडका?” असा सवाल नागरिकांतून होत आहे काही घंटागाड्या नादुरुस्त असून गॅरेजमध्ये थांबवल्या आहेत. तरीही चालकांना पगार दिला जातो का? गाड्यांचे ऑडिट होऊन ठेकेदारावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रिया :

“कचरा संकलन ठेक्याची मुदतवाढ लवकरच संपत असून पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. ई-टेंडरिंग प्रक्रिया सुरू असून काही दिवसांत टेंडर फ्लॅश केले जातील.”
— तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 104000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 79000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1215/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed