अमळनेर नगर परिषदेचा ईको-फ्रेंडली गणेशोत्सव : शाळू मातीच्या गणेशमूर्तीने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश..

0
New-Doc-08-25-2025-23.44.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अमळनेर नगर परिषदेकडून यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनातून शाळू मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती नगर परिषदेच्या कार्यालयात साकारण्यात आली आहे. ही मूर्ती संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी आणि पर्यावरणास अनुकूल आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळू मातीच्या गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नगर परिषदेचे कर्मचारी श्री. अविनाश बोरसे यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे त्यांनी कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेताही मागील नऊ वर्षांपासून आपल्या घरी शाळू मातीचे गणपती साकारले आहेत. यूट्यूबद्वारे आत्मसात केलेली ही कला त्यांनी छंद म्हणून जोपासली आहे.

सुमारे एक फूट उंचीची गणेशमूर्ती केवळ ३ ते ४ दिवसांत साकारण्यात आली असून तिच्या रंगसुद्धा नैसर्गिक आणि पर्यावरणपूरकच ठेवले जातील. या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर कोणताही अपाय न होता ती संपूर्ण विरघळते.

नगर परिषदेच्या या उपक्रमाला अधिक प्रभावी करण्यासाठी विविध शाळा आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अशा कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला जात आहे.

नगर परिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने तो एक प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed