श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय करण्यासाठी स्वयंस्फुर्तीने सेवाकार्याचे आवाहन.                          खा. स्मिता वाघ व आ. अनिल पाटील यांचे प्रतिपादन.

0
New-Doc-08-25-2025-23.57.jpg

आबिद शेख/अमळनेर
श्री मंगळग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी येणारा श्री मंगळ जन्मोत्सवाचा मंगल महायोग हा दर २७ वर्षांनी लाभणारा योग असून, तो यावर्षी २ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पवित्र सोहळ्यासाठी देशभरातून भाविक अमळनेरात दाखल होणार असून, त्यांच्या सोयीसाठी व जन्मोत्सव अविस्मरणीय व्हावा यासाठी सर्वांनीच स्वयंस्फुर्तीने सेवाकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी केले.

श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त २९ व ३१ ऑगस्ट तसेच २ सप्टेंबर रोजी भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी २४ ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिर प्रसादलयात बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आमदार अनिल पाटील म्हणाले की, अमळनेरकरांची ओळख ही भारतभरातील वाहनांवरील श्री मंगळग्रह मंदिराच्या स्टिकरमुळे आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे जन्मोत्सवादरम्यान प्रत्येक भाविकाला समाधान वाटेल याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. तसेच मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी यांचा अचानक दौरा होऊ शकतो. त्यामुळे पोलिस प्रशासनावर अतिरिक्त ताण न देता नागरिकांनी जबाबदारीने सेवाकार्य करणे गरजेचे आहे.

खासदार स्मिता वाघ यांनीही पालिकेबरोबरच नागरिकांनी रस्ते, पथदिवे, सुशोभीकरण याकडे लक्ष द्यावे, असे सांगून जन्मोत्सव आपला घरचा कार्यक्रम समजून प्रत्येकाने सेवाकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमांची रूपरेषा व सुरू असलेली तयारी याची माहिती दिली. बैठकीत प्रमोदिनी पाटील, उज्वला शिरोडे, करुणा सोनार, लालचंद सैनानी यांनी सूचना मांडल्या.

बैठकीस मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, सीईओ आर. जी. चव्हाण यांच्यासह प्रकाश मेखा, विनोद कदम, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, उज्वला शहा, आशिष चौधरी, ए. डी. भदाने, बाळा पवार, उमाकांत हिरे, चंद्रकांत महाजन, राहुल पाटील, निलेश महाजन यांच्यासह सामाजिक, राजकीय, व्यावसायिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed