अमळनेर तालुक्यात सीसीआय केंद्र मंजूर : शेतकरी वर्गात उत्साह – खासदार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया..

आबिद शेख/अमळनेर
मागील वर्षी काही तांत्रिक व अपरिहार्य कारणांमुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी सीसीआय (भारतीय कपास निगम) केंद्र मिळू शकले नव्हते. मात्र यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच खासदार स्मिता उदय वाघ यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उपमहाप्रबंधक कार्यालयात तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून अखेर यावर्षी अमळनेर तालुक्यात सीसीआय केंद्राला मंजुरी मिळाली आहे.
या निर्णयामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खासदार स्मिता ताई वाघ यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, त्यांचे हित जपले जावे या उद्देशानेच सातत्याने प्रयत्न केले. अखेर यंदा तालुक्यात सीसीआय केंद्र सुरू होणार असून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.”
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
