जळगाव दौऱ्यावर आमदार इद्रीश नायकवाडी यांची भेट : अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर चर्चा..
आबिद शेख/अमळनेर

जळगाव : महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष मा. इद्रीशजी नायकवाडी साहेब यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान आज विशेष भेट घेण्यात आली.
या भेटीत अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचारांबाबत सविस्तर चर्चा झाली. नायकवाडी साहेबांनी यासंदर्भातील प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका, मार्गदर्शन आणि रणनीतीवरही चर्चा करण्यात आली जामनेर येथील सुलेमान खान प्रकरणावरही सविस्तर विचारविनिमय झाला. अल्पसंख्याक समाजाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही याबाबतही मुद्दा मांडण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये :
ताहीर बॅग मिर्झा,कलीम शेख,अलीम मुजावर, मोईज सैय्यद , शैफ खान व कार्यकर्ते
तसेच इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
