दानियाल हज-उमरा टूर्सच्या नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन..

0
New-Doc-08-24-2025-22.41.jpg

24 प्राईम न्यूज 22 Aug 2025


धुळे ––हज-उमरा यात्रेकरूंच्या सेवेसाठी मागील पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या दानियाल हज-उमरा टूर्स संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी, शुक्रवार नमाज-ए-असरनंतर अनसार कॉम्प्लेक्स, तिरंगा चौक, ८० फूट रोड, पहिला मजला, दुकान क्र. १, अनसार मशिदीजवळ, धुळे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमास जळगाव, एरंडोल, भुसावळसह परिसरातील अनेक उलेमा, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उलेमांनी कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

दानियाल हज-उमरा टूर्स मागील अनेक वर्षांपासून यात्रेकरूंना उत्कृष्ट सेवा देत असून, प्रवासादरम्यान संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देणे हीच त्यांची ओळख राहिली आहे. आता यात्रेकरूंना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी धुळ्यात नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा गौरव करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed