मुंबई विद्यापीठाच्या अभय आळशीने पटकावला राज्यस्तरीय साथी संदेश वक्तृत्व करंडक..

0
New-Doc-08-25-2025-06.32.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर –साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहानिमित्त रविवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित राज्यस्तरीय साथी संदेश वक्तृत्व करंडक स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा अभय कृष्णकांत आळशी याने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर यश रवींद्र पाटील (मुंबई), तृतीय क्रमांकावर विवेक पितांबर पाटील (जळगाव) हे विजेते ठरले. तर अलिबागचे पंकज पंढरीनाथ पांडुळे आणि पुण्याचे रमेश सुनील कचरे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. उत्तेजनार्थ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले. तर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे करंडक सोमवारी माजी आमदार बच्चू कडू व माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत पुणे, मुंबई, अमरावतीसह राज्यभरातील ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या द्वितीय वैखरी निमित्त हा करंडक स्पर्धेचा उपक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ऍड. अशोक बाविस्कर, भास्कर बोरसे, किरण पाटील, प्रा. डॉ. शेख शकील जलालोद्दीन, तसेच संयोजन समितीचे गोपाळ नेवे, दर्शना पाटील, ऍड. कौस्तुभ पाटील, मनीष उघडे, दीपक महाजन, समाधान पाटील, प्रा. लीलाधर पाटील, जयवंतराव पाटील, रणजित शिंदे, एस. डी. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षक, पालक, पत्रकार व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. योगेश पाटील, प्रा. वैशाली पाटील, ऍड. सारांश सोनार यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘बालसागर भारत होवो’ या गीताने केली. त्यानंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत विजेते ठरलेले मयूर गजानन पाटील, कल्याणी संदीप पाटील व जयेश संदीप बागुल यांनी मनोगत व्यक्त केले.

संयोजन समितीतील दर्शना पवार, ऍड. कौस्तुभ पाटील, प्रा. योगेश पाटील, ऍड. सारांश सोनार, प्रा. वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर व धनश्री वानखेडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तिन्ही शाळांच्या शिक्षक-शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed