अमळनेरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश. *सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार, संतोष लोहरे व मार्केट संचालक नितीन पाटील यांचा समावेश..

0
New-Doc-08-24-2025-22.10-1.jpg


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहर व तालुक्यातील काही राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

या प्रवेशामध्ये अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व गडखांब सरपंच नितीन खुशाल पाटील, शहरातील सुप्रसिद्ध बिल्डर व सामाजिक कार्यकर्ते हेमंत पवार, तसेच गांधलीपुरा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहरे यांचा समावेश आहे.

जळगाव येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांनी त्यांचे पक्षात औपचारिक स्वागत केले.

दरम्यान, नितीन पाटील हे बाजार समितीचे माजी सभापती बापूराव खुशाल पाटील यांचे सुपुत्र असून, प्रथमच बाजार समितीत संचालक म्हणून ते विजयी झाले आहेत. हेमंत पवार हे बिल्डर व्यवसायासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. तर संतोष लोहरे हे माजी नगरसेविका श्रीमती मायाबाई लोहरे यांचे सुपुत्र असून, त्यांच्या मातोश्री ‘आ. शिरिषदादा मित्र परिवार’ या गटातून नगरसेविका राहिल्या असताना, त्यांनी त्या गटाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

लवकरच आणखी काही मातब्बर कार्यकर्त्यांचा प्रवेश होण्याचे संकेत मिळत असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठी बळकटी देणारे ठरणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed