अमळनेर येथे ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे रक्तदान शिबीर. 107 दात्यांचा उत्स्फूर्त सहभाग – “रक्तदान हेच जीवनदान” संदेश.

आबिद शेख /अमळनेर अमळनेर :प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय, अमळनेर येथे आज दि. 24 ऑगस्ट रोजी राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या 18 व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात 107 दात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विद्यालयाच्या संचालिका विद्या दीदी, सुषमा दीदी, रंजू दीदी, आरती दीदी, वैष्णवी दीदी, ऍड. तिलोत्तमा पाटील, पत्रकार संघ अध्यक्ष चेतन राजपूत, माजी नगरसेवक विनोद कदम, इम्रान खाटीक, जितेंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात दादी प्रकाशमणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील व विद्या दीदी यांनी “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाने रक्तदात्यांचे मनोबल उंचावले.
या शिबिरासाठी हरचंद लांडगे, ऍड. तिलोत्तमा पाटील, जितेंद्र वाणी, प्रेमराज सूर्यवंशी, रमेश सैंदाणे, नरेंद्र महाजन, रमेश शिसोदे, पवन लांडगे, प्रा. राजेंद्र मोराणकर, धनंजय सोनवणे, अजय भोळे, नरेंद्र पाटील, निलेश चौधरी, अविनाश वाघ, यश माळी, रंगराव पाटील, योगेश पाटील, नीलिमा महाजन, निलेश भांडारकर, गणेश चौधरी, प्रा. हिरालाल पाटील, संतोष पाटील आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
विशेष योगायोग
मुंबई ए. टी. एस. पोलीस पथकातील जितेंद्र सूर्यवंशी यांनी आतापर्यंत 17 वेळा रक्तदान केले होते. आज त्यांनी 18 व्या वेळेस रक्तदान केले आणि हेच शिबिर दादी प्रकाशमणी यांच्या 18 व्या पुण्यतिथी निमित्ताने झाले, हा अनोखा योगायोग विशेष ठरला.
जीवन ज्योती रक्तपेढीचे संतोष वाघ, सुनेला गावीत, योगेश महाले, अक्षय बारेला व गौरव पालीवाल यांनी रक्तगट तपासणी व संकलनाची जबाबदारी सांभाळली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
