“मूर्तीकार व्हा” कार्यशाळेत बालकुमारांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनी लुटला मातीशी खेळण्याचा आनंद..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर –साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित “मूर्तीकार व्हा” या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या जागेवर उत्साहात पार पडले.
या कार्यशाळेत बालकुमारांबरोबरच पालक व प्रौढांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि मातीशी खेळत सुबक गणेशमूर्ती घडविण्याचा अनोखा आनंद अनुभवला.
प्रशिक्षक म्हणून डॉ. लिना चौधरी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी सर्वांनी मनोभावे गणेशमूर्ती साकारल्या. स्वागत तुषार पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दर्शना पवार यांनी केले.
पावसाचे अधूनमधून पडणारे थेंब आणि बैलपोळ्याचे औचित्य असूनही कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कबीर पाटील, डॉ. राखी माळी, भार्गवी देसले, समृद्धी देसले, अमृता पाटील, मायरा, राम, ओम, रोहित सोनार, मल्हार, तेजस, प्रथमेश चौधरी, संदीप घोरपडे, सुनिल पाटील, तुषार पाटील, दर्शना पवार, अतूल चौधरी आदींनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
