अंबऋषी टेकडीवर वृक्षारोपणअमळनेर एल. आय . सी. चा उपक्रम:—
आबिद शेख/ अमळनेर

22 ऑगस्ट रोजी अमळनेर एल .आय. सी. शाखेतर्फे अंबऋषी टेकडीवर वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी अमळनेर एल आय सी शाखेचे शाखा प्रबंधक तुषार जोशी,प्रशासकीय अधिकारी सतिश भगत,प्रशासकीय अधिकारी हेमंत संधान,राहूल विणेकरी, उच्च श्नेणीसहाय्यक ज्ञानेश्वर बागुल,सचिन दोंदे,सुनिल डुकले,विकास अधिकारी भगवान नंदवे, तुषार झेंडे, अजय रोडगे, विमा प्रतिनिधी गोरव चौधरी संजय पाटील, दिपक मोरे भरत सैंदाणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दरवर्षी अमळनेर येथे अंबऋषी टेकडीवर वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यात टेकडी ग्रुपचे सदस्य लावलेल्या वृक्षांना पाणी व त्यांचे संगोपन करतात या पाश्वभूमीवर अमळनेर एल आय सी शाखेतर्फे याप्रसंगी शंभर वृक्ष लावण्यात आली .या स्तुत्य उपक्रमात टेकडी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
टेकडीवर वृक्षारोपणासाठी एल आय सी शाखा अमळनेर अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
