अमळनेरला तिरुपती-हिसार (खाटू श्याम) एक्सप्रेसचा थांबा : खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश..

0
New-Doc-08-22-2025-21.28.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी व भाविकांसाठी मोठा दिलासा देणारी आनंदाची बातमी म्हणजे खासदार स्मिताताई वाघ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तिरुपती-हिसार (खाटू श्याम) एक्सप्रेस गाडीला अखेर अमळनेर स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला आहे.

आज या गाडीचा पहिला थांबा अमळनेर येथे घेण्यात आला. या वेळी रेल्वे स्थानकावर गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. या सोहळ्याला डॉ. अनिल शिंदे, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, ग्रामीण मंडल अध्यक्ष राहुल पाटील, लालचंद सैनानी, हरचंद लांडगे, नीरज अग्रवाल, श्याम पाटील, प्रीतपालसिंग बग्गा, सरचिटणीस भरतसिंह परदेशी, महेश पाटील, सुभाष मामा, महेश संदनशिव तसेच स्टेशन मास्टर अनिल जी. शिंदे उपस्थित होते.

खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेला हा थांबा अमळनेर शहर व परिसरातील नागरिकांसाठी मोठी सोय ठरणार आहे. खाटू श्याम बाबाच्या दर्शनासाठी जाणारे भाविक तसेच तिरुपतीकडे जाणारे यात्रेकरू याचा लाभ घेणार आहेत. या निमित्ताने प्रवाशांनी व भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत करीत खासदार स्मिताताई वाघ यांचे मनःपूर्वक आभार मानले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed