जळगाव जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव : बैलपोळा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन.
24 प्राईम न्यूज 22 Aug 2025

जळगाव जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत ७२ जनावरे दगावली आहेत. एकूण १ हजार ६५ जनावरे बाधित झाली असून त्यापैकी ४६७ जनावरांवर उपचार सुरू, तर ५५८ जनावरे उपचाराअंती बरी झाली आहेत. मात्र, रोग आटोक्यात आलेला नसल्याने यंदा बैलपोळा हा सण सामूहिक न करता घरगुती पद्धतीने साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ४.९६ लाख पशुधनांपैकी ४.८४ लाखांहून अधिक जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून लसीकरणाचे प्रमाण ९७ टक्के आहे. उपचाराअंती बरे होण्याचे प्रमाण ५२ टक्के असल्याची माहिती विभागाने दिली. अधिकारी व कर्मचारी सातत्याने बाधित जनावरांवर उपचार करत आहेत तसेच प्रसार रोखण्यासाठी दक्षता घेतली जात आहे.
दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या भाग म्हणून जनावरांच्या आठवडी बाजारपेठेत खरेदी-विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. सामूहिक बैलपूजन, बैलांच्या शर्यती, जत्रा व प्रदर्शनास परवानगी नाही. बाधित जनावरांच्या संपर्कातील गवत, वैरण, कातडी व साहित्य नियंत्रित क्षेत्राबाहेर नेण्यास सक्त मनाई आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की,
“बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा सण आहे, मात्र जनावरांचे आरोग्य ही खरी प्राथमिकता आहे. मोठ्या प्रमाणावर जनावरे एकत्र आल्यास संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी पोळा घरच्या घरी, सुरक्षिततेची काळजी घेत साधेपणाने साजरा करावा.”
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, लम्पीचा प्रसार रोखणे ही सामूहिक जबाबदारी आहे आणि आपल्या सहभागातूनच पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवता येईल.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
