सुलेमान हत्या प्रकरण“मुख्य आरोपी अजूनही मोकाट; पोलिसांवर राजकीय दबाव?” _एस डी पी आय.                     “ही घटना महाराष्ट्रापुरती नव्हे तर भारतासाठी कलंक – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद”

0
New-Doc-08-22-2025-21.40-1.jpg

24 प्राईम न्यूज 22 Aug 2025


जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बेटावद येथे घडलेल्या मोब लिंचिंग प्रकरणात निर्दोष सुलैमान खान पठाण यांचा मृत्यू होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत. परंतु अद्यापपर्यंत या घटनेतील मुख्य गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलेली नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावांचाही उल्लेख करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असून, हे आरोपी एका मोठ्या राजकीय नेत्याचे निकटवर्तीय असल्याने त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालण्यात येत असल्याचा ठपका उपस्थित करण्यात आला आहे.

या निषेधार्थ आज सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी आयूश प्रसाद यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. तब्बल अर्धा तास चाललेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाच्या भावना ऐकून घेतल्या आणि या प्रकरणात तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी संवादादरम्यान सांगितले की –
“ही घटना महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण भारत देशासाठी अत्यंत वेदनादायक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. प्रशासन या प्रकरणी कायद्याने निश्चित कारवाई करेल.”

या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून SDPI व एकता संघटना यांच्या वतीने प्रशासनाकडे खालील ठाम मागण्या करण्यात आल्या –
१) या घटनेतील सर्व मुख्य गुन्हेगारांना तातडीने अटक करावी.
२) एस आय टी मधील आय ओ मधुकर कासार यांना त्वरित तपासातून काढून टाकावे.
३) फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या लेखी जवाब नुसार आरोपींवर त्वरित कारवाई करण्यात यावी.
४)आरोपीवर मकोका सह संगनमताचे कलम लावण्यात यावे.

५) आरोपींवर कठोर कलमे लावून जलदगती न्यायालयात खटला चालवावा.
६)मृत सुलैमान खान पठाण यांच्या कुटुंबास तातडीने आर्थिक मदत व शासकीय नोकरीतून पुनर्वसन द्यावे.
७) अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना आखाव्यात.

या आंदोलनाद्वारे जिल्हा प्रशासनास इशारा देण्यात आला की, जर तातडीने दोषींना अटक करून न्याय मिळाला नाही, तर पुढील काळात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल.

जिल्हाधिकारी यांचेशी ३५मिनिटे चर्चा
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना त्यांच्या केबिनमध्ये सदर धरणे आंदोलनाबाबत व मागण्याबाबत स्पष्टपणे आपले विचार मांडले व प्रशासनाने पोलीस विभागाला त्वरित आमच्या भावनाशी अवगत करावे अन्यथा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्यास पोलीस विभाग जबाबदार राहील तसेच आरोपीविरुद्ध कारवाई व राजकीय हस्तक्षेप बाबत सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक व कायदेशीर बाजू समजून सांगितली त्यात जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य सुद्धा त्यांनी नमूद केली.अत्यंत चांगल्या प्रकारे शिष्टमंडळाला मार्गदर्शन केले या चर्चेत एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख, जामनेर काँग्रेस पक्षाचे अशपाक पटेल व जामनेरचे सामाजिक कार्यकर्ते व या प्रकरणात पहिल्यापासून कार्यरत असलेले जावेद मुल्लाजी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश

एसडीपीआयचे अध्यक्ष मौलाना मतीन देशपांडे,उपाध्यक्ष मौलाना कासिम नदवी ,फारूक शेख, अशपाक पटेल , जावेद मुल्लाजी, अन्वर सिकलगर, मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल , अनिस शहा, मतीन पटेल, कासिम उमर, मौलाना उमेर नासिर, एस डी पी आय ची कार्यकारणी त्यात प्रामुख्याने जनरल सेक्रेटरी सोहेल शेख व अरबाज शेख खजिनदार चिरागोदिन शेख, कार्यकारी संचालक जुनेद सय्यद, अबूजर मिर्झा, हादी अन्सारी, जुनेद शेख, अमीन पटेल, अल्ताफ शेख सह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed