धावत्या रेल्वेत गुंगीचे औषध देऊन लूटमार – पंजाबचा सराईत गुन्हेगार अमळनेर आरपीएफच्या जाळ्यात.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : धावत्या रेल्वेत तिघा प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लूटमार करणाऱ्या पंजाबातील सराईत गुन्हेगाराला अमळनेर रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी कुलभूषणसिंग चौहान यांच्या तत्परतेने अटक करण्यात आली आहे. सध्या तिन्ही प्रवासी बेशुद्धावस्थेत असून त्यांच्यावर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना बुधवारी पहाटे अहमदाबाद–हावडा एक्स्प्रेसमध्ये नवापूरजवळ घडली. एक प्रवासी महिला तिघा पुरुषांना एका पंजाबी व्यक्तीने पेय देताना पाहिले. काही वेळात ते बेशुद्ध पडले व त्या व्यक्तीने त्यांचे पैसे, मोबाईल व बॅगा घेऊन पळ काढला. नवापूर स्थानकाजवळ गाडी मंदावताच आरोपी धावत्या रेल्वेतून उतरला. महिलेनं ही बाब जितेंद्र पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्वरित अमळनेर आरपीएफला माहिती दिली.
आरपीएफ अधिकारी चौहान यांनी वरिष्ठांना सतर्क केले. आरोपी परत सुरतला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उदना स्थानकावर बंदोबस्त लावला. सकाळी नऊ वाजता भुसावळ–सुरत मेमु गाडीत संशयित व्यक्ती तिन्ही बॅगा घेऊन प्रवास करताना दिसला. त्याला पकडून चौकशी केली असता त्याने आपले नाव निशांतसिंग (रा. गुरदासपूर, पंजाब) असे सांगितले. त्याच्याकडून पाच मोबाईल, सात हजार रुपये, गुंगीचे औषध व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सकाळी ९.२० वाजता अहमदाबाद–हावडा एक्स्प्रेस अमळनेर स्टेशनवर पोहोचताच तिघा बेशुद्ध प्रवाशांना हेडकॉन्स्टेबल सुनीलकुमार, राकेशकुमार व राजुराम यांनी उतारवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी त्यांना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवले.
बेशुद्ध प्रवाशांपैकी वयोमान अंदाजे ५५, २० आणि १६ वर्षे असून ते कोलकाता येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील ५५ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
