एमआयडीसी पोलीसांची यशस्वी कामगिरी – मोटार सायकल चोरटा गजाआड.

0
New-Doc-08-21-2025-10.05.jpg

24 प्राईम न्यूज 21 Aug 2025

जळगाव : एमआयडीसी पोलीसांनी तत्पर कारवाई करत मोटार सायकल चोरटा गजाआड केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 09.00 ते 11.00 वाजेच्या दरम्यान त्यांची ऍक्टीव्हा क्र. MH-19 BR-8538 एचडीएफसी बँक, पांडे चौक येथे लावून सरकारी दवाखान्यात गेले असता, अज्ञात चोरट्याने ती संमतीविना चोरून नेली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक श्री. माहेश्वर रेड्डी व मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते यांनी सूचनादिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत व पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, स.फौ. विजयसिंग पाटील, पो.ना. प्रदीप चौधरी व पो.कॉ. विशाल कोळी यांचे पथक तयार करण्यात आले.

तपासदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे चोरीची ऍक्टीव्हा जळगाव येथील रामेश्वर कॉलनीत असल्याचे समजले. चौकशीअंती सदर वाहन आरोपी अनुराग जाधव (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याने चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी 19 ऑगस्ट 2025 रोजी आरोपीस अटक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला एक दिवस पीसीआर वर ठेवण्यात आले असून त्याच्याकडून चोरीस गेलेली ऍक्टीव्हा हस्तगत करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पो.ना. प्रदीप चौधरी हे करीत आहेत.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed