“दहिवदचा भूमिपुत्र वासुदेवजी देसले – पोलीस सेवेसह सामाजिक कार्यातही अग्रणी”
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील आदर्श गाव दहिवद हे नेहमीच विविध क्षेत्रात गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सुपुत्रांसाठी ओळखले जाते. या गावातील भूमिपुत्र स्व. आमदार दादासाहेब गुलाबराव पाटील यांचे कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.
आता या गावातीलच एक शेतकरी कुटुंबातील सुपुत्र आदरणीय गुरूवर्य आण्णासाहेब श्री. वासुदेवजी देसले महाराष्ट्र पोलीस दलात उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्रिंबकेश्वर पेठ विभागात कार्यरत आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी पोलीस दलात तसेच स्थानिक समाजजीवनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कर्तव्य निभावताना समाजकार्यातील बांधिलकीही तेवढीच जपणारे देसले साहेब हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गावांच्या प्रश्नांमध्ये तत्पर सहभाग आणि ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठ तालुक्यातील बोरीची बारी गावातील पाण्याची समस्या. गावकऱ्यांना पाणी आणण्यासाठी ३-४ किमी अंतर चालावे लागत होते. परिस्थिती पाहून देसले साहेबांनी एनजीओच्या माध्यमातून पाझर तलाव व नाल्यांचे खोलीकरण करून दिले. यामुळे गावातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटली.
स्वतःच्या दहिवद गावातही त्यांनी पाणीप्रश्न व जिल्हा परिषद शाळेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक कार्यात सदैव तत्पर राहणाऱ्या देसले साहेबांचे अमळनेर तालुका, जळगाव जिल्हा व संपूर्ण खान्देशात विशेष कौतुक केले जाते.
मारवड, गोवर्धन, बोरगाव व पंचक्रोशीतील शेतकरी परिवार तसेच संपूर्ण खान्देशातील जनतेतर्फे त्यांना मनःपूर्वक अभिनंदन व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा!
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
