अमळनेरात ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे 24 ऑगस्ट रोजी महा रक्तदान शिबिर ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्याचा उपक्रम – अमळनेरकरांना आवाहन..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – ब्रह्माकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका, माउंट अबू (राजस्थान) येथील राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या 18 व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे भारतासह नेपाळभर भव्य रक्तदान अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली जाणार असून, अमळनेर याचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे.
रविवार, दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत ब्रह्माकुमारी विद्यालय, दादासाहेब देशमुख नगर (मराठा मंगल कार्यालयाजवळ) येथे अमळनेर शाखेतर्फे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एक लाख युनिट रक्तदानाचे लक्ष्य
या महाअभियानात तब्बल एक लाख युनिट रक्तदानाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, अध्यात्मिक संस्थेमार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच असा उपक्रम हाती घेतला जात आहे. ब्रह्माकुमारी संस्था या माध्यमातून जागतिक विक्रमाचा मान मिळवणार असल्याची माहिती अमळनेर ब्रह्माकुमारी संस्थेच्या संचालिका बी.के. विद्या दीदी यांनी दिली.
रक्तदात्यांसाठी विशेष नोंदणी व्यवस्था
शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांसाठी एक विशेष गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. यात रक्तदात्याचे नाव, ठिकाण, वेळ, दिनांक, रक्तदात्यांची संख्या तसेच सहयोगी संस्थांची नावे नमूद केली जाणार आहेत.
या शिबिरातून अमळनेरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय स्तरावरील या महाअभियानाचा भाग बनावे, असे आवाहन ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
