अमळगाव ग्रामपंचायतीचा पूरग्रस्तांना आधार – नवीन घरकुले, दुकाने व अंगणवाडींसाठी शासनाकडे निधीची मागणी..

0
New-Doc-08-19-2025-22.37.jpg



अमळनेर दि. १७ ऑगस्ट रोजी चिखली नदीला आलेल्या महापुरामुळे अमळगाव, पिंपळी अमळगाव, मेहेरगाव, निंभोरा यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरून घरांचे व दुकानांचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी अमळगाव ग्रामपंचायत पुढे सरसावली आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच इंजी. गिरीश सोनजी पाटील, उपसरपंच जयेश कोळी तसेच सदस्य नाना कुंभार, संजय धोबी, निखिल महाले, नरेंद्र चौधरी, हिम्मत पारधी, गजानन पाटील, माजी सरपंच एकनाथ भिल आदींनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. हायस्कूल, मराठी शाळा, अंगणवाडी, मरीआई मंदिर मागील घरकुले, शॉपिंग सेंटर तसेच आदर्श विद्यालयाचे संपूर्ण प्रांगणही पाण्याखाली गेल्याचे त्यांनी पाहिले.

तलाठी सौ. पंजे यांच्या सहकार्याने पंचनामे करण्यात आले असून, ग्रामपंचायतीने ठराव करून पूरग्रस्तांना नवीन घरकुले, दुकाने आणि अंगणवाडी इमारत उभारण्यासाठी शासनाकडे निधी मिळविण्याचा ठराव करण्यात आला आहे.

सदर पाहणीवेळी ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76600/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed