अमळनेर मतदारसंघात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – आ.अनिल पाटील..

0
New-Doc-08-19-2025-22.26.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – अमळनेर मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पीडित शेतकरी बांधवांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.

निम्न तापी पाडळसरे धरणाच्या कामानिमित्त दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांची भेट निश्चित झाल्याने ते प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांना भेट देऊ शकले नसले तरी त्यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवत मदत कार्य सुरू ठेवले असल्याचे सांगितले.

पातोंडा, नांद्री, अमळगाव, खेडी तसेच पारोळा तालुक्यातील शेळावे परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरेही कोसळली असून याबाबत त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत कार्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत.

तसेच माजी जि. प. सदस्य सौ. जयश्री पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसन मंत्र्यांना याची माहिती दिल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. पंचनामे लवकरच पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76600/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed