वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला.

0
New-Doc-08-19-2025-22.56.jpg


अमळनेर/ पातोडा
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पातोंडा-नांद्री लवण नाल्यात आलेल्या पुरात वाहून गेलेले शेतकरी सर्जेराव संतोष बिरारी (वय 55) यांचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी मंगळवारी ग्रामस्थांना तरंगताना दिसून आला.

घटनेनंतर प्रशासनाने शोधमोहीम राबवली होती, मात्र दोन दिवसांपर्यंत मृतदेह मिळू शकला नव्हता. अखेर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले.
संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्जेराव बिरारी हे घरातील कर्ता पुरुष होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed