निम्न तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही केंद्र सरकारकडून मदत – ना. सी. आर. पाटील यांची ग्वाही..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – निम्न तापी प्रकल्प (पाडळसरे धरण) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) मध्ये समाविष्ट झाल्यानंतर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी २७०० कोटींपैकी ८५९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता धरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही केंद्र सरकारकडून मदत मिळणार असल्याची ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांनी दिली आहे.
नवी दिल्ली येथे संसद भवनात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी मंत्री पाटील यांची विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार पाटील आणि खासदार वाघ यांनी प्रकल्पाच्या समावेशाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले तसेच दुसऱ्या टप्प्यातही भरीव मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री पाटील यांनी प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी यासाठी केंद्र शासनाकडून भरघोस सहाय्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत पहिल्या टप्प्यातच दुसऱ्या टप्प्यातील अंशतः गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पहिल्या टप्प्यात बंद पाईपलाईनद्वारे जवळपास ८३ हजार एकर शेतीला पाणी उपलब्ध होणार असून संपूर्ण बागायती क्षेत्र निर्माण होईल. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे १८ हजार हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण करण्याबाबतही चर्चा झाली आहे.
आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांनी मंत्री पाटील यांना पाडळसरे धरण भेटीसाठी निमंत्रण दिले असून, लवकरच प्रकल्पाला भेट देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या निर्णयामुळे अमळनेर मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळणार असून शेती व ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76600/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
