जळगाव जिल्ह्याला पावसाचा तडाखा; हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले
24 प्राईम न्यूज 19 Aug 2025

जळगाव :रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्याला झोडपून काढले आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत असून, विदर्भातील पावसामुळे पूर्णा नदीला आलेल्या पूरामुळे तापी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडून तब्बल ६४,७३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तापीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी विविध तालुक्यांत फिरून नुकसानीची पाहणी करत आहेत.
तालुकानिहाय परिस्थिती
अमळनेर तालुका : पातोंडा व नांद्री येथील पारधी वस्त्यांमध्ये पूरपाणी शिरल्याने नागरिकांना शाळा व स्थानिक भवनात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
रावेर तालुका : अभाडा धरण भरून वाहू लागले असून शेतात पाणी साचले आहे. नागझिरी व कातखेडा येथील नाले ओसंडून वाहत आहेत. नागझिरी नाल्यावरील संरक्षक भिंत कोसळल्याने आठ शेळ्यांचा बळी गेला.
बोदवड तालुका : एका झाडाच्या घरावर कोसळण्याची घटना घडली असून, घरातील व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
जळगाव, धरणगाव, पाचोरा तालुके : मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा प्रशासन घेत आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1185/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
