गडखांब येथील चिखली नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; जबाबदार कोण?

0
New-Doc-08-19-2025-07.05.jpg

आबिद शेख/ अमळनेर

गडखांब (ता. अमळनेर) दि. १७ रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे गडखांब येथील चिखली नदीला पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे गडखांब, धुपी, मांजर्डी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. पिके वाहून गेली असून शेतबांध कोसळले तसेच जमिनी खरडून वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या संपूर्ण नुकसानीस जबाबदार सिंचन विभाग जि.प. जळगाव आणि ग्रामपंचायत गडखांब आहे. कारण, चिखली नदीवरील सिमेंट बंधाऱ्यावरील पाणी आडवण्यासाठी टाकण्यात आलेल्या लोखंडी पाट्या शासनाच्या नियमानुसार मान्सूनपूर्व काळात काढून टाकणे आवश्यक होते. मात्र या पाट्या वेळेवर न काढल्यामुळेच पुरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून शेतकरी प्रश्न विचारत आहेत की, “आमची स्वतःची पिके आणि जमीन आता ओळखावी कशी?”

शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांचा मोबदला, शेतबांध दुरुस्तीसाठीचा खर्च तसेच जमीन लेवलिंगचा खर्च तातडीने मंजूर करून द्यावा. अन्यथा २६ जानेवारी २०२६ रोजी तहसील कार्यालयावर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी
१) सोपानदेव आनंदाराव पाटील
२) मंगेश भास्कर पाटील
३) सुरेशा ताराचंद पाटील
४) राहुल सुरेश पाटील
५) नथू धर्मा पाटील
६) मोतीलाल भूतन पाटील
७) युवराज रामदास पाटील

शेतकऱ्यांच्या या मागणीची शासनाने दखल घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1185/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed