अमळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर..

0
New-Doc-08-19-2025-06.48.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रारूप प्रभाग रचना व भौगोलिक सीमा दिनांक १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली आहे. अमळनेर शहरासाठी यंदा ३६ सदस्यांसाठी १८ प्रभागांची रचना करण्यात आली आहे.

हरकती व सूचना नोंदविण्यासाठी नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत सादर कराव्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दाखल झालेल्या हरकतींवरील सुनावणीसाठी संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली.

दरम्यान, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये प्रभाग रचनेबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. २०१७ च्या निवडणुकीत एकूण १७ प्रभागांमधून ३४ सदस्य निवडून आले होते. मात्र, यंदा एक प्रभाग आणि दोन सदस्य संख्या वाढविण्यात आली असून अनेकांच्या प्रभाग रचनेत बदल झाला आहे. त्यामुळे काहींमध्ये समाधान तर काहींमध्ये नाराजी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हरकती व सूचनांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1185/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed