अमळनेरमध्ये मातीशी खेळून बघा! मूर्तीकार व्हा! – अनोखी कार्यशाळा २२ ऑगस्ट रोजी.

आबिद शेख/अमळनेर
धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या सान्निध्यात कला जागवण्याची संधी अमळनेकरांना मिळणार आहे. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने “मातीशी खेळून बघा! मूर्तीकार व्हा!” ही कार्यशाळा शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खुली असून, सहभागींसाठी आवश्यक साहित्य स्वतःसोबत आणणे बंधनकारक आहे. यामध्ये १ किलो शाडूमाती (भिजवलेली/कोरडी), पॅड/लाकडी फळी, वाटी/प्लास्टिक डबा, रिकामी रिफिल, पाण्याची बाटली, वर्तमानपत्र व पेन्सिल या वस्तूंचा समावेश आहे. सहभागींच्या सोयीसाठी कार्यशाळेच्या ठिकाणी एक किलो शाडूमाती फक्त १५ रुपयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संवादक व संयोजकांच्या सूचनांचे पालन, शांतता व स्वयंशिस्त यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
कार्यशाळेचे ठिकाण – साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रस्ता, अमळनेर.
अधिक माहितीसाठी संपर्क –
मो. क्र.: 9421702841, 9422278419, 9422790610, 9075570510
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1185/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
