धुळे येथील विद्यार्थिनी राहीन हुसैन सिकलीगरला शैक्षणिक मदतीचा हात..
आबिद शेख/ अमळनेर

धुळे शहरातील विद्यार्थिनी राहीन तजबम्मूल हुसैन सिकलीगर हिने यावर्षी इयत्ता 10 वी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी ए.आय.टी. ज्युनिअर कॉलेज, धुळे येथे इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र, वार्षिक फी भरण्यासाठी तिला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करत इर्शादभाई जागिरदार यांनी राहीनला फी भरण्यासाठी धनादेश प्रदान केला. या वेळी नूरा भाई शेख उपस्थित होते.
तसेच ए.आय.टी. ज्युनिअर कॉलेजचे फैसल शकीन व शाहीन अन्सारी यांनी फीमध्ये सवलत देऊन विद्यार्थिनीच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाची मदत केली. राहीन व तिच्या कुटुंबीयांनी या उदार सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
