नूतन मंडळ सोसायटीत चेअरमन नामदेव बडगुजर व व्हाईस चेअरमन रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड..
आबिद शेख/ अमळनेर

मांडळ ता. अमळनेर नूतन मंडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित, मांडळ येथे झालेल्या निवडणुकीत चेअरमन पदावर श्री. नामदेव पोपट बडगुजर तर व्हाईस चेअरमन पदावर श्री. रवींद्र रावण पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवड दिनांक १६ ऑगस्ट २०२५, शनिवार रोजी दुपारी बारा वाजता झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. सुनील महाजन (सहकार अधिकारी) यांनी काम पाहिले, तर सचिव म्हणून श्री. रवींद्र हिम्मत पाटील यांनी कार्यभार सांभाळला.
संचालक मंडळावर श्री. देविदास पुना कोळी, सौ. ललिता विलास सोनवणे, इंदुबाई यशवंत पाटील, शालिग्राम नथू बडगुजर, सुंदरबाई धोंडू कोडी, दिगंबर हिंमत मराठे, सुभाष माधवराव पाटील, शेख फारुक शेख रज्जाक, सुरेश दगा धनगर, सोमनाथ नारायण खैरनार, रवींद्र हिम्मत पाटील, सचिव प्रदीप कौतिक पाटील (शिपाई) उपस्थित होते.
नवीन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अशोक पाटील, माजी पंचायत समिती सभापती डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील, सरपंच दीपक बडगुजर, माजी सरपंच विनायक बडगुजर, विजय पाटील, मनोहर पाटील, रतिलाल पाटील, जितेंद्र पाटील, शिवसेना नेते बाळासाहेब पवार, भाजप नेते अनिल जैन, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते स्वप्निल पाटील, वासू मामा सोसायटीचे माजी चेअरमन वसंत दासबो, भानुदास पाटील, संदीप सर शिरसाट, रावसाहेब शिरसाट, पैलवान उमेश मगरे, माजी उपसरपंच सिताराम शिरसाट, पांडू भिल, पोलीस पाटील सुरेश सर, हेमंत पाटील, भैय्यासाहेब पाटील, चेतन पाटील, मंगलदास कांबळे, माजी पोलीस पाटील भास्कर पाटील, माजी चेअरमन संजय पेंढारकर, नाना नवल धनगर, चंद्रकांत भिल आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने निवड झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1190/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
