अमळनेर भावसार समाजाचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात..


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर भावसार क्षत्रिय समाज व अखिल महाराष्ट्र भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा रविवार, दि. १५ ऑगस्ट रोजी श्री संत सखाराम महाराज भक्त निवास, वाडी चौक येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक येथील श्री. दिपक चिंधुशेठ सारजे यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजाध्यक्ष श्री. परेश शांतीलाल भावसार यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विनोद जाधव (जाधव क्लासेस), श्री. किरण माळी (IKD क्लासेस), श्री. हर्षल बडगुजर (सुमन केमेस्ट्री क्लासेस), अॅड. चंद्रकांत पाटील (शिखर अकॅडमी), श्री. अरुण रामप्रसाद भावसार (अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र भावसार समाज), तसेच श्री. सुभाष झेंडू भावसार (माजी अध्यक्ष, संयुक्त खान्देश) यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अखिल महाराष्ट्र भावसार समाजातर्फे स्थानिक अध्यक्ष श्री. परेश भावसार, तालुकाध्यक्ष श्री. भास्कर भावसार, श्री. नंदलाल भावसार व कार्यक्रमाध्यक्ष श्री. दिपक सारजे यांचा सत्कार श्री. अरुण रामप्रसाद भावसार यांच्या हस्ते करण्यात आला.
गुणगौरव सोहळ्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी समाजाध्यक्ष श्री. परेश भावसार यांनी रु. ११११/-, अध्यक्ष श्री. दिपक सारजे यांनी रु. ११,१११/- तर श्री. संजय नांदोडे (धुळे) यांनी रु. ५५५/- शिक्षण फंडासाठी देणगी जाहीर केली.
यानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण समिती चेअरमन श्री. सागर सुभाष भावसार यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. दिपक तुकाराम भावसार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष नंदलाल भावसार, सेक्रेटरी कृष्णकांत भावसार, सहसेक्रेटरी निलेश भावसार, खजिनदार रविंद्र भावसार, तसेच कार्यकारी सदस्य व इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1190/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
