नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द सन्मानित

जळगाव (१५ ऑगस्ट) : स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे आयोजित नाविन्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत अमळनेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द यांची बालिका स्नेही पंचायत म्हणून निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा परिषद सीईओ मीनल करणवाड उपस्थित होते.

पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीने गावात राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. जिल्ह्यातून पाच ग्रामपंचायतींची निवड झाली असून, अमळनेर तालुक्यातून एकमेव पिंपळे खुर्द ग्रामपंचायत सन्मानित झाली आहे.

या यशानंतर गावात ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी गावातील प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, उपसरपंच मीना सतीश पाटील, सर्व सदस्य, ग्रामसेवक के. के. लंकेश शिरुड, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

जळगावहून पुरस्कार घेऊन आल्यानंतर गावात सर्वांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी कैलासवासी सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालय, पिंपळे बुद्रुक येथील मुख्याध्यापक संजय भोसले सर व शिक्षक वृंद यांनीही सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा गौरव केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed