अमळनेर येथे नशा मुक्ती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धा व वृक्षारोपण..

0
New-Doc-08-16-2025-23.42.jpg


आबिद शेख/अमळनेर
शासनाच्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानांतर्गत अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात नशा मुक्तीबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, संस्थेचे सचिव श्रीकांत पाटील, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, पोलीस पाटील भागवत पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम म्हणाले की, “नशेचे प्रमाण हळूहळू ग्रामीण भागात वाढत आहे. मुले व्हाईटनर सारख्या घातक पदार्थांचे व्यसन लावून घेत आहेत. अशा व्यसनामुळे नंतर ते गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे समाजातून व्यसनमुक्तीची चळवळ प्रभावीपणे राबवली पाहिजे.”

यावेळी शाळेतील तब्बल २०० विद्यार्थ्यांनी नशामुक्ती अभियानावर निबंध लेखन केले. तसेच पोलीस निरीक्षक निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रभुदास पाटील यांनी मानले. कार्यक्रमास अशोक सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, सीमा पाटील, प्रवीण पाटील, मनोज पाटील, सुदर्शन पवार, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1190/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed